शिवाजी महाराजांच्या नावावर संतोषीमातेची जागा तुम्ही बळकावून बसला आहात. सामान्य माणसाला आमिष दाखवलत, काही दिवस सर्व सामान्य लोकांचे मजेत गेले. हक्काची विरंगुळ्याची जागा दिली अन नंतर हळूच कधी त्यावर जागेवर डल्ला मारलात कळलेच नाही.
आज त्या जागेवर भक्क अंधार असतो. जे स्मारक तुम्ही तयार केल तिथे मन मानेल तेव्हा उजाला अन मानेल तेव्हा अंधार अस्तो. त्याच कारण एक तुम्हाला अन देव ( असलाच त ) त्याला ठाऊक.
आज लोकांनी पराभूत केलाय ते राजकीय नाही त सामाजिकदृष्ट्या पराभूत केलय. आता काही दिवसात तुम्ही शिवतीर्थ सामान्य लोकांना खुले करून दिले नाहीत त एक दिवस धुळेकरच तीर्थाच गेट उखडून टाकतील.
तुम्ही जागा बळकवायची असेल त खुशाल बळकावून बसा पण एक ध्यानात ठेवा शिवाजी महाराज, जिजाऊ अन तुळजाभवानी हि काय कोणाची जहागीर नाही. हि आमची दैवत आहेत आमचा अभिमान आहे, जी तुम्ही तुरुंगात बंद करून ठेवलीत अन त्याला शिवतीर्थ हे गोंडस नाव दिलय. आता तुम्ही एक त आम्हाला शिवतीर्थ खुले करून द्या नाही त जागा ठेवा तुम्हाला अन आमची दैवत आम्ही दुसरीकड नेतो जिथे आम्हाला स्वातंत्र्य असेल आम्हाला हव तेव्हा आमच्या दैवतांच दर्शन घेता येईल, हव तेव्हा तिथ डोक ठेवता येईल.
(अपूर्ण)
-
चगेल भान्या